Student Facilitation Center
कॉलेजच्या सुरवातीपासून ते शेवटपर्यंत अनेक कार्यालयीन कामाशी आपला संबंध येतो. ज्यामध्ये प्रवेशासाठीचे फॉर्म्स, पात्रतेचे फॉर्म्स, टाईम-टेबल, हॉल-तिकीट, डिग्री प्रमाणपत्र अशा अनेक गोष्टी वारंवार विद्यापीठात जाऊन कराव्या लागतात. या कामांसाठी विद्यार्थी व कॉलेजला लागणारा वेळ, पैसा आणि परिश्रम यांची बचत करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना वैयक्तिक सुविधा घरबसल्या कमी वेळेत पोहोचविण्यासाठी सोलापूर विद्यापीठातर्फे "ई-सुविधा" हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या "ई-सुविधा" उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी सहभागी व्हा.
आपला १६ अंकी PRN कॉलेजमधून मिळवा.
आपला PRN हा आपला लॉगीन आयडी आहे आणि पासवर्ड हा आपल्या जन्म तारखेचा नुसार तयार करण्यात आला आहे. समजा तुमची जन्म तारीख 010693 (DDMMYY) असेल तर आपण पासवर्ड 930601(YYMMDD) या प्रमाणे एन्टर करावा.
|